आरती

आरती ज्ञानराजा

संत ज्ञानेश्वरांची आरती.

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा

लोपलें ज्ञान जगी
हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविलें ज्ञानी

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा

कनकाचे ताट करी
उभ्या गोपिका नारी
नारद तुंबर हो
साम गायन करी

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा

प्रकट गुह्य बोले
विश्व ब्रह्माचि केलें
रामजनार्दनी पायी मस्तक ठेविलें

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा

- रामजनार्दनी