दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्ममरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी
त्रिभुवनीं भुवनी पाहतां तुज ऐसें नाही
चारी श्रमले परंतु न बोलावे काही
साही विवाद करितां पडले प्रवाहीं
ते तूं भक्तांलागी पावसी लवलाहीं
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशांपासुन सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी
- नरहरि