आरती

जय जय सत्चितस्वरूपा

दासगणू महाराजांची आरती.

जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड मूढ ताराया

जय देव जय देव

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी
तें तू तत्त्व खरोखर निःसंशय अससी
लीलामात्रे धरिले मानवदेहासी

जय देव जय देव

होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा
करूनि गणि गण गणात बोते या भजना
धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना

जय देव जय देव

लीला अनंत केल्या बंकटसदनास
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश

जय देव जय देव

व्याधी वारून केले कैकां संपन्न
करविले भक्तालागी विट्ठलदर्शन
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन

जय देव जय देव

- दासगणू महाराज