आमची केली हीन याती ।
तुज का न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खाता ।
लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरी भात दही ।
खावोनी कैसा म्हणसी नाही ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
कासया जन्म दिला मला ॥४॥
कर्ममेळा श्रीपतीला विचारतो, आमची याती हीन केली, हे तुला कळत नाही का. जन्म उष्टे खाता गेला, तुमच्या चित्ताला लाज येत नाही. आमच्या घरी भात आणि दही आहे, खाऊन कसा नाही म्हणतोस. चोख्याचा कर्ममेळा म्हणतो, मला काय जन्म दिलास.
- संत कर्ममेळा