अभंग

आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें

संत तुकारामांचा अभंग.

आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें ।
शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥

घरी धन शब्दरूपी रत्ने आहेत, आणि शब्दांची शस्त्रे आहेत. त्यांचा यत्न करायचा. शब्द हे जीवाचे जीवन आहे. शब्दाने धन लोकांना वाटायचे. तुका म्हणतो, शब्द हाच देव आहे. शब्दानेच गौरवपूजा करायची.

- संत तुकाराम