अवघा रंग एकचि झाला ।
रंगात श्रीरंग गुंतला ॥१॥
मी तूंपण गेले वाया ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेद नाही भाव ।
अवघा झाला एक देव ॥३॥
सोयरा म्हणे चोखोबासी ।
देव अवघा झाला आम्हासी ॥४॥
अवघा रंग एक झाला आहे, आणि त्या रंगात श्रीरंग गुंतला आहे. पंढरीच्या रायाकडे पाहता मी आणि तू हे गेले. भेद उरला नाही, भाव उरला नाही, अवघा एक देव झाला. सोयरा चोखोबाला म्हणते, देव अवघा आम्हां झाला.
- संत सोयराबाई