भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माउलीची ॥३॥
तुका ह्मणे मज लागलीसे भूक ।
धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥
भेटीची आस जीवा लागली आहे. रात्रंदिवस वाट पाहिली जाते. पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन आहे, तसे मन वाट पाहते. दिवाळीच्या मुळा लेक माहेराची वाट पाहते, तशी पंढरीची वाट पाहिली जाते. भुकेले बाळ माउलीची वाट पाहते. तुका म्हणतो, मला भूक लागली आहे. देवा, धावून श्रीमुख दावी.
- संत तुकाराम