अभंग

दळितां कांडितां

संत जनाबाईंचा अभंग.

दळितां कांडितां ।
तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबे क्षणभरी ।
तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार ।
मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी ।
तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी ।
ह्मणे नामयाची दासी ॥५॥

दळता कांडता अनंताला गाणार, असे जनाबाई म्हणतात. क्षणभरही नाम विसरू नये. नित्याचा कारभार हाच आहे, मुखी हरि निरंतर. मायबाप, बंधू आणि बहिणी तूच आहेस. चक्रपाणी सखा आहे. नामदेवाची दासी म्हणते, लक्ष चरणाला लागले.

- संत जनाबाई