अभंग

हरिउच्चारणीं अनंत पापराशी

ज्ञानदेवांचा हरिपाठ ११.

हरिउच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपता हरी ॥२॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध ।
पळे भूतबाधा भय याचें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

हरीचा उच्चार होताच अनंत पापराशी क्षणमात्रांत लयास जाते. तृण अग्नीला मिळून एकरूप होते, तसे नाम जपताना होते. हा मंत्र अगाध आहे. भूतबाधा त्याच्या भयाने पळते. ज्ञानदेव म्हणतात, हरि माझा समर्थ आहे. उपनिषदांचा अर्थ त्याला कोणाकडून करून घ्यावा लागत नाही.

- संत ज्ञानेश्वर