समाधि हरीची सम सुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एका केशवराजे सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
हरीची समाधी समसुखावाचून साधत नाही, आणि द्वैतबुद्धी असेल तर ती साधत नाही. बुद्धीचे वैभव दुसरे काही नाही. एका केशवराजाने सगळ्या सिद्धी होतात. ऋद्धी, सिद्धी आणि निधी ही उपाधी आहे, जोवर मन परमानंदात गेलेले नाही. ज्ञानदेव म्हणतात, समाधान रमले आहे, आणि हरीचे चिंतन सर्वकाळ आहे.
- संत ज्ञानेश्वर