अभंग

हरिनाम जपे तो नर दुर्लभ

ज्ञानदेवांचा हरिपाठ १६.

हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा ।
तेणें दशदिशा आत्माराम ॥४॥

हरिनाम जपणारा माणूस दुर्लभ आहे, पण रामकृष्ण हे नाम जिभेला सोपे आहे. त्या नामात उन्मनी साधली की सगळ्या सिद्धी लागतात. सिद्धी, बुद्धी आणि धर्म हरिपाठात आले, आणि साधुसंगाने प्रपंच निवाला. ज्ञानदेव म्हणतात, रामकृष्णाचा ठसा हे नाम आहे. त्यामुळे दशदिशा आत्माराम होतात.

- संत ज्ञानेश्वर