हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥
हरिपाठ मुखाने गायला की देह पवित्र होतो. तपाच्या सामर्थ्याने जो अमूप तपतो, तो कल्प वैकुंठी नांदतो. माता, पिता, भ्राता आणि अपार सगोत्र चतुर्भुज नर होऊन राहिले. ज्ञानदेवाला गूढ गम्य लाभले, आणि ते निवृत्तिने हाती दिले.
- संत ज्ञानेश्वर