वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन ।
एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरीविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र ।
यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥४॥
वेद, शास्त्र, पुराण आणि श्रुतीचे वचन एक नारायण सांगते. तोच सार जप आहे. जप, तप आणि कर्म हरीवाचून धर्म नव्हे. तो श्रम व्यर्थ जातो. जे हरिपाठात गेले ते निवांत राहिले, भ्रमर फुलात गुंततो तसे. ज्ञानदेव म्हणतात, हरिनामाचा मंत्र शस्त्र आहे. यमाने त्यांचे कुळगोत्र वर्जले.
- संत ज्ञानेश्वर