नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरी नारायण हरी ।
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥
नामाचा नित्य नेम असलेला प्राणी दुर्लभ आहे. लक्ष्मीवल्लभ त्याच्या जवळ असतो. नारायण हरी म्हणता त्यांच्या घरी भुक्ती आणि चार मुक्ती असते. हरीवाचून जन्म नरक आहे, आणि तो प्राणी यमाचा पाहुणा होतो. ज्ञानदेव निवृत्तीला विचारतात, नामाची चाड आहे. ते गगनाहून मोठे आहे.
- संत ज्ञानेश्वर