अभंग

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं

ज्ञानदेवांचा हरिपाठ २५.

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

जाणीव आणि नेणीव भगवंतात नाही. मोक्ष हरीच्या उच्चारात पाहावा. नारायण हरी हा नामाचा उच्चार आहे, आणि तेथे कळिकाळाची रीघ नाही. ते प्रमाण वेदांनाही कळत नाही, मग जीवजंतूंना कसे कळेल. ज्ञानदेव म्हणतात, नारायणपाठाचे फळ असे आहे की सर्वत्र वैकुंठ केले आहे.

- संत ज्ञानेश्वर