अभंग

भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति

ज्ञानदेवांचा हरिपाठ ४.

भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

भावावाचून भक्ती उभी राहत नाही, आणि भक्तीवाचून मुक्ती नाही. बळ नसताना शक्तीची भाषा बोलू नये. देव लवकर प्रसन्न कसा होईल, यासाठी वाया शीण करू नये. निवांत राहावे. रात्रंदिवस प्रपंचाचा सायास करतोस, हरीला का भजत नाहीस. ज्ञानदेव म्हणतात, हरिजप केला की प्रपंचाचे धरण तुटते.

- संत ज्ञानेश्वर