संतांचे संगती मनोमार्गगती ।
आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
संतांच्या संगतीने मनाला मार्ग सापडतो, आणि त्या वाटेने श्रीपती आकळावा. रामकृष्ण ही जीवाची वाचा आहे, आणि शिवाचा आत्मा रामजप आहे. एका तत्त्वात नाम साधले की द्वैताचे बंधन राहत नाही. नामामृताची गोडी वैष्णवांना लागली, आणि योग्यांना जीवनकळा साधली. प्रल्हादात हा उच्चार बिंबला, उद्धवाला कृष्णदाता लाभला. ज्ञानदेव म्हणतात, नाम सोपे आहे, पण ते जाणणारा विरळा आहे.
- संत ज्ञानेश्वर