अभंग

हें चि दान देगा देवा

संत तुकारामांचा अभंग.

हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देईं सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासीं ।
सुखें घालावें आम्हासी ॥३॥

एकच दान मागितले आहे, तुझा विसर पडू नये. गुण गाईन ही आवड, आणि हीच माझी जोडी. मुक्ती नको, संपदा नको. संतसंग सदा दे. तुका म्हणतो, गर्भवासी आम्हाला सुखाने घाला.

- संत तुकाराम