अभंग

कांदा मुळा भाजी

संत सावता माळ्यांचा अभंग.

कांदा मुळा भाजी ।
अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी ।
अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सावता म्हणे केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविला गळा ॥४॥

सावता माळी आपला मळाच पंढरी पाहतो. कांदा, मुळा आणि भाजी ही अवघी विठाबाई आहे. लसूण, मिरची आणि कोथिंबीर, अवघा हरी झाला. मोट, नाडा, विहीर आणि दोरी, यात पंढरी व्यापली. सावता म्हणतो, मळा केला, आणि विठ्ठलाच्या पायी गळा गोविला.

- संत सावता माळी