मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लावियेलें द्वारीं ।
तयाचा वेलू गेला गगनावरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेवीवरु विठ्ठलें अर्पिला ॥३॥
दारात लावलेला मोगरा फुलला आहे. फुले वेचू लागलो, तर कळ्या आणखी बहरल्या. इवलेसे रोप द्वारी लावले होते, पण त्याचा वेल गगनावर गेला. मनाच्या गुंतीने शेला गुंफला, आणि तो बाप रखुमादेवीवर, विठ्ठलाला, अर्पिला.
- संत ज्ञानेश्वर