नाचूं कीर्तनाचे रंगीं ।
ज्ञानदीप लावूं जगीं ॥१॥
सर्व सांडूनी व्यापार ।
एक विठ्ठलचि धरूं ॥२॥
भाव भक्ति अंतरीं ।
वाचे गाऊं श्रीहरी ॥३॥
नामा म्हणे आम्ही हरिनामाचे वाचक ।
नामें तिन्ही लोक उद्धरिले ॥४॥
कीर्तनाच्या रंगात नाचायचे आहे, आणि जगात ज्ञानाचा दीप लावायचा आहे. सारे व्यापार सोडून एक विठ्ठल धरायचा. अंतरी भाव आणि भक्ती ठेवून वाचेने श्रीहरी गावा. नामदेव म्हणतात, आम्ही हरिनामाचे वाचक आहोत. नामाने तिन्ही लोक उद्धरले.
- संत नामदेव