नको देवराया अंत आतां पाहूं ।
प्राण हा सर्वथा फुटों पाहे ॥१॥
जळावेगळी मासोळी जैसा तळमळी ।
तैसा मी बापुडी तळमळत ॥२॥
तुजविण कोण सोडवी संकटीं ।
धांव घालीं भेटी जगज्जीवना ॥३॥
कान्होपात्रा म्हणे चरणीं ठेविला माथा ।
संकटांत आतां तारीं मज ॥४॥
देवराया, आता अंत पाहू नको. प्राण फुटू पाहतो, असे कान्होपात्रा सांगते. पाण्याबाहेरची मासोळी तळमळते, तशी ही तळमळ आहे. तुझ्यावाचून संकटातून कोण सोडवणार. ती म्हणते, माथा चरणी ठेवला आहे. संकटात तार.
- संत कान्होपात्रा