ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी पाणी नोहे डोंगें ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥
चोखा सांगतो की आकार वाकडा असला तरी आतील रस सरळ असतो. ऊस वाकडा असला तरी रस वाकडा नसतो. धनुष्य वाकडे असले तरी बाण वाकडा नसतो. नदी वळणदार असली तरी पाणी वळणदार नसते. तो म्हणतो, मी वाकडा असलो तरी भाव वाकडा नाही. वरच्या रंगाला का भुललास.
- संत चोखामेळा