अभंग

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा

संत तुकारामांचा अभंग.

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संतां समागमें ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि ।
लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख ।
गोडावलें मुख तुका ह्मणे ॥४॥

विठ्ठल गीतीत गावा, चित्तीत ध्यावा, आणि विटेवर उभा पाहावा. तो अनाथांचा बंधू आहे, कृपेचा सिंधू आहे. भवबंध आणि यमपाश तो तोडतो. शरणागतांना तो मुक्ती देतो, आणि संतांच्या समागमात असतो. त्याचे नाम घेता सुख झाले, आणि मुख गोडले, असे तुका म्हणतो.

- संत तुकाराम