गाणी

भक्त आवडता भेटला । बोलूं

नामदेवांचा पाळणा.

भक्त आवडता भेटला । बोलूं चालूं विसरला ॥१॥
बरवें सांपडलें वर्म । करी भागवत धर्म ॥२॥
संत संगतीं साधावें । धरूनि ह्रदयीं बांधावें ॥३॥
हा भावाचा लंपट । सांडूनि आलासे वैकुंठ ॥४॥
नामा म्हणे केउता जाये ॥ आमचा गळा त्याचे पाय ॥५॥

या पाळण्यात सांगितले आहे. भक्त आवडता भेटला , बोलूं चालूं विसरला. पुढे बरवें सांपडलें वर्म , करी भागवत धर्म. शेवटी नामा म्हणे केउता जाये आमचा गळा त्याचे पाय.

- संत नामदेव