गाणी

जो जो जो जो रे गजवदना । प

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे गजवदना । पतीतपावना ।
निद्रा करि बाळा गजवदना । मुत्युंजय नदंना ॥धृ॥
पाळणा बांधियला जाडिताचा । पालख या सोन्याचा ।
चांदवा लाविला मोत्यांचा । बाळ निजवी साचा ॥१॥
दोर धरुनिया पार्वती । सखियांसह गीत गाती ।
नानापरी गुण वर्णाती । सुस्वर आळवीती ॥२॥
निद्रा लागली सुमुखाला । सिंदुर दैत्य आला ।
त्याते चरणाने ताडिला । दैत्य तो मारिला ॥३॥
बालक तान्हे हे बहुकारी । दैत्य वधिले भारी ।
करिती आश्‍चर्य नरनारी । पार्वती कोण उतरी ॥४॥
ऎसा पाळणा गाईला । नानापरी आळविला ।
चिंतामणि दास विनविला । गणनाथ निजविला ॥५॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे गजवदना , पतीतपावना , निद्रा करि बाळा गजवदना , मुत्युंजय नदंना पाळणा बांधियला जाडिताचा , पालख या सोन्याचा , चांदवा लाविला मोत्यांचा , बाळ निजवी साचा. पुढे दोर धरुनिया पार्वती , सखियांसह गीत गाती , नानापरी गुण वर्णाती , सुस्वर आळवीती. शेवटी ऎसा पाळणा गाईला , नानापरी आळविला , चिंतामणि दास विनविला , गणनाथ निजविला.

- पारंपरिक