गाणी

शिवाचा पाळणा

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे त्रिनयना । निज बा पंचानना ।
सृष्टी संहार तमोगुणा । भोळ्या निर्मळ मना ॥धृ॥
सृष्टी संहार तुज तेणे । बहु झाली जागरणॆ ।
तो भ्रम सांडुनिया त्वां देणे । निजी निजसुख घेणे ॥१॥
भिक्षाटण करिता अवधूता । श्रमलासी बहु फिरता ।
सांडुनि निजकांता त्वा वसता । केला डोंगरमाथा ॥२॥
ऎसा बैरागी नि:संगी । होतासी तू जोगी ।
तो तु स्त्रीलागी अर्धांगी । घेऊनि फिरसी जगी ॥३॥
अहा त्वा कैसे तप केले । भिल्लीने भुलविले ।
बाळपणासी धरियेले । बायलेच्यानी बोले ॥४॥
ऎसा निलाजरा तू अससी । शंका नाही तुजसी ।
किती रे सांगावे तुजपाशी । त्र्यंबक प्रभु सुखराशी ॥५॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे त्रिनयना , निज बा पंचानना , सृष्टी संहार तमोगुणा , भोळ्या निर्मळ मना सृष्टी संहार तुज तेणे , बहु झाली जागरणॆ , तो भ्रम सांडुनिया त्वां देणे , निजी निजसुख घेणे. पुढे भिक्षाटण करिता अवधूता , श्रमलासी बहु फिरता , सांडुनि निजकांता त्वा वसता , केला डोंगरमाथा. शेवटी ऎसा निलाजरा तू अससी , शंका नाही तुजसी , किती रे सांगावे तुजपाशी , त्र्यंबक प्रभु सुखराशी.

- पारंपरिक