गवळण

भला तूं हरी कळलासी रडीवाला

नामदेवांची गवळण २७.

भला तूं हरी कळलासी रडीवाला ॥धृ०॥
विधीचें अक्षर खरें हें असतां ।
अजासुताचे कां जाले हाल ॥१॥
पाराशरसुत वरचढ जाला ।
म्हणून कां त्वां फुगविले गाल ॥२॥
बळीनें तुज पाहे खरीद केलें ।
खर्चून तो धनमाल ॥३॥
नामा मनीं निर्भय गुरुवर कृपे ।
तुजलागीं देतो हे प्रतिख्याल ॥४॥

हरी, तू रडीवाला कळलास. विधीचे अक्षर खरे असताना अजासुताचे हाल का झाले. पाराशराचा सुत वरचढ झाला म्हणून गाल का फुगविले. बळीने तुला खरीद केले, धनमाल खर्चून. नामा मनात निर्भय आहे, गुरुवर कृपेने तुला प्रतिख्याल देतो.

- संत नामदेव