गवळण

चाल सखिये वेगु करीं वहिला

नामदेवांची गवळण १८.

चाल सखिये वेगु करीं वहिला ।
दिन सरला काळ थोडा उरला ॥१॥
आवडी घेऊं गे निजसुख धनीचें ।
आर्त पुरोनी जें उरलेंसे मनींचें ॥२॥
कृष्णमुख पाहे द्दष्टी भरोनी ।
चित्त सांडी कुरवंडी करोनी ॥३॥
झणीं विसरसी हे खूण निरुती ।
मग अंतरलें सर्व सुख पुढती ॥४॥
हाचि निर्धार करुनियां मानसीं ।
आंत बाहेरी हरिरूप देखसी ॥५॥
नामया स्वामी राजीवलोचनु ।
रमारमणू तो जीवींचा जीवनू ॥६॥

सखी, वेगाने चाल, दिन सरला आणि काळ थोडा उरला. धनीचे निजसुख आवडीने घेऊ, मनातले आर्त पुरवून. कृष्णमुख दृष्टी भरून पहा, चित्त सोडून कुरवंडी कर. ही खूण विसरू नको, नाहीतर पुढे सर्व सुख अंतरेल. हा निर्धार मनात धर, आत बाहेर हरिरूप पहा. नामयाचा स्वामी राजीवलोचन आहे, रमारमण जीवाचे जीवन आहे.

- संत नामदेव