चंद्रबिंबासरी देखों जरी मुखा ।
कोटी चंद्रप्रभा देखा कृष्णमूर्ति ॥१॥
धवळलें चांदिणें रांगतां रांगणें ।
धन्यवो गौळणी सुखी तुम्ही ॥२॥
कानींचीं कुंडलें गुरूशुक्र बिंबले ।
शिरीं तें शोभलें पिंपळपान ॥३॥
कटीं वाघनखें साजिरी ते सरी ।
कडदोरा वरी राजसासी ॥४॥
सकुमार दोंदिलें किंकिणी कटींतटीं ।
चरणीं नाद उठी नेपुरांचा ॥५॥
श्रुति समागमें नाद ऐके कानीं ।
संतोषोनी मनीं डुल्ले हरी ॥६॥
देखोनियां माते होय समाधान ।
उतरी निंबलोण मुखावरूनी ॥७॥
सच्चिदानंदघन ताम्हुलें आपण ।
विष्णुदास नामयानें वोवाळिलें ॥८॥
मुख चंद्रबिंबासारखे दिसते, कृष्णमूर्ती कोटी चंद्रप्रभा आहे. रांगताना चांदणे धवळले, गौळणी धन्य आणि सुखी आहेत. कानी कुंडले, शिरी पिंपळपान, कटी वाघनखे आणि कडदोरा, किंकिणी आणि नेपुरांचा नाद. श्रुती समागमाने नाद ऐकतो, मन डुल्लतो. मातेला समाधान होते, निंबलोण उतरते. विष्णुदास नामयाने सच्चिदानंदघन ताम्हुल ओंवाळले.
- संत नामदेव