गवळण

चिदानंद दोंदिल बाळ सांवळें

नामदेवांची गवळण २९.

चिदानंद दोंदिल बाळ सांवळें ।
कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥
तें सुख कवणें वाचें बोलिजे ।
चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥
परा परतली पश्यंति तन्मया ।
मध्यमा वैखरी पावली हो लया ॥३॥
आलिंगना लागुनी बाम्हा स्फुरती ।
देह न दिसे पाहतां कृष्णमूर्ति ॥४॥
तेथें आर्तीचा आनंदू गोठला ।
तो हा कृष्णरूपें अंकूर उठिला ॥५॥
नामया स्वामी सबाह्याभ्यंतरीं ।
गेले रसरंग गोकुळाभीतरीं ॥६॥

चिदानंद दोंदिल बाळ सांवळे आहे, कृष्ण पाहता नयनात मन मावळते. ते सुख कोणत्या वाचेने बोलावे, चित्त चैतन्य समरसाने भोगावे. परा परतली, पश्यंती तन्मय झाली, मध्यमा आणि वैखरी लयाला गेल्या. आलिंगनाला लागून बाम्हा स्फुरते, कृष्णमूर्ती पाहता देह दिसत नाही. आर्तीचा आनंद गोठला, कृष्णरूपाने अंकुर उठला. नामयाचा स्वामी आत बाहेर गोकुळात रसरंगला.

- संत नामदेव