गवळण

ध्यान सांवळें गोकुळींचें

नामदेवांची गवळण ९.

ध्यान सांवळें गोकुळींचें ।
धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥

सांवळीसी आंगीं उटी ।
सांवळी कस्तुरी लल्लाटीं ।
सांवळीसी कांसे कासियला कटीं ।
गोवळिया ॥१॥

सांवळीसी तनु वरवी ।
सांवळें वृंदावन मिरवी ।
सांवळ्याशा तुळसी कानीं ।
मंजुरिया कोंवळिया ॥२॥

संवळीसी कंठीं माळा ।
सांवळें ह्रदयीं पदक विशाळा ।
सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या ।
गोंवळिया ॥३॥

सांवाळिसी हातीं काठी ।
सांवळासा कांबळा पाठीं ।
नामयाचा स्वामी गायी राखी ।
धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥

गोकुळाचे ध्यान सांवळे आहे. हरी सांवळ्या, वेगाने धावून ये. आंगावर उटी आहे, कस्तुरी ललाटीवर आहे, कटीला कांस कासले आहे. तनु वरवी आहे, वृंदावन मिरवते, कानी तुळस आहे. कंठी माळ आहे, हृदयावर विशाळ पदक आहे, गोपी ओंवाळ्या झाल्या आहेत. हाती काठी आहे, पाठीवर कांबळा आहे. नामयाचा स्वामी धवळ्या आणि पिवळ्या गाई राखतो.

- संत नामदेव