गौळणी ठकविल्या ।
गौळणी ठकविल्या ।
एक एक संगतीनें मराठी कानडीया ।
एक मुसलमानी ।
कोकणी ।
गुजरणी अशा पांचीजणी गौळणी ठकविल्या ॥ध्रु०॥
गौळणी सुंदरी ।
गौळणी सुंदरी ।
गेल्या यमुनेतीरीं ।
वस्त्रें फेडूनियां स्नान करिती नारी ।
गोविंदानें वस्त्रें नेलीं कळंबावरी ।
स्नान करोनियां त्या आल्या बाहेरी ॥१॥
लडोबा गोविंदा ।
लडोबा गोविंदा ।
निरवाणी आज ।
आडचाल्लो पडचाल्लो ।
शीर फोडया न कोडो ।
मारी कन्हय्या पानी खेळ्या न खेळो ॥२॥
देखेरे कन्हय्या ।
देखेरे कन्हय्या ।
मै इज्यतकी बडी ।
कदम पकडुंगी ।
मैयां कुटीजुडी ।
मेरी चुनरी दे मेरीले दुल्लडी ॥३॥
देवकी नंदना देवकी नंदना ।
तूं ऐक श्रीपती ।
उघडी हिंवाची तुज विनवूं किती ।
पायां पडत्यें बा ।
मी येत्यें काकुळती ।
माझी साडी दे ।
घे नाकाचें मोतीं ॥४॥
पावगा दाताला ।
पावगा दाताला ।
तूं नंदाचा झिलो ।
माकां फडको दी ।
मी हिंवान मेलों ।
घे माझो कोयतो ।
देवा पायां पडलों ॥५॥
ज्योरे माधवजी ।
ज्योरे माधवजी ।
मे शरण थई ।
तनकाकाकैपी ।
बाप दयाळ तूंही ।
मारी साडी आपो ।
हातणीले कंकणी ॥६॥
इतुकें ऐकुनी ।
इतुकें ऐकुनी ।
देव बोले हांसोनी ।
सूर्या दंडवत करा कर जोडुनी ।
नामाविनवितो ।
म्हणे सारंगपाणीं ।
गौळ्या ऐक तूं ।
धन्य तुझी करणी ॥७॥
पाच गौळणी ठकविल्या, मराठी, कानडी, मुसलमानी, कोकणी आणि गुजराणी संगतीने. गौळणी यमुनेतीरी वस्त्रे फेडून स्नान करत होत्या, गोविंदाने वस्त्रे कळंबावर नेली. स्नान करून बाहेर आल्या, आणि वेगवेगळ्या बोलींत विनंती करतात, साडी परत द्या. देव हसून बोलतो, सूर्याला दंडवत करा. नामा सारंगपाणीशी विनवितो, गौळ्या तुझी करणी धन्य आहे.
- संत नामदेव