गवळण

गोपाळाशीं खेळती

नामदेवांची गवळण ३२.

गोपाळाशीं खेळती ।
आनंदें डोलती ।
कृष्ण आमुचा सांगाती ।
डो डो डो डो डो ॥१॥

कान्होबाची संगती ।
ब्रम्हादिक इच्छिती ।
धन्य आम्हां म्हणविती ।
अ ल ल ल ल ॥२॥

कृष्णाप्रती गोपाळ ।
म्हणताती सकळ ।
अकळशी नाकळ ।
हा त त त त ॥३॥

मामा मारूं गेलासी ।
आपटिलें गजाशी ।
मल्लयुद्ध खेळलासी ।
हु तु तु तु तु ॥४॥

अजगर मारिला ।
वडवानळ गिळिला ।
गोवर्धन उचलिला ।
अ ब ब ब ब ॥५॥

पूतनेसी शोषिलें ।
नारदासी मोहिलें ।
गाणिकेसी उद्धरिलें ।
अ रे रे रे रे ॥६॥

गौळियांचे घरां जाशीं ।
दहीं दुध लोणी खाशी ।
त्यांच्या सुना भोगिसी ।
छि छी छी छी छी ॥७॥

सोळा सह्स्र भोगिशी ।
ब्रम्हचारी म्हणविशी ।
लटिकेंचि ठकविशी ।
कु लु लु लु लु ॥८॥

सोडूनियां मीपण ।
आम्हां घाली लोटंगण ।
परब्रम्हा नारायण ।
आ हा हा हा हा ॥९॥

ऐसे तुझे पवाडे ।
वर्णिताती वाडेंकोडं ।
विष्णुदास नामा म्हणे ।
यु यु यु यु यु यु ॥१०॥

गोपाळांशी खेळतात, आनंदाने डोलतात, कृष्ण आमचा सांगाती आहे. कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छितात. सगळे त्याला गोपाळ म्हणतात, तो अकळ आहे. मामाला मारायला गेला, गजाला आपटले, मल्लयुद्ध खेळला. अजगर मारला, वडवानल गिळला, गोवर्धन उचलला. पूतनेला शोषले, नारदाला मोहिले, गणिकेला उद्धरले. गवळ्यांच्या घरी जातो, दहीदूध लोणी खातो. सोळा हजार भोगतो आणि ब्रह्मचारी म्हणवतो. मीपण सोडून आम्हाला लोटंगण घालतो, तो परब्रह्म नारायण आहे. विष्णुदास नामा म्हणतो, असे तुझे पवाडे वाडेकोड वर्णन करतात.

- संत नामदेव