गवळण

हरी तुझी ऐसी कैसी हे खोड

नामदेवांची गवळण २५.

हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु०॥
घेउनी चिमुटे मुळसी पळसी ।
गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥
सोडूनी वांसरें गाईसी पाजिसी ।
यांत तुज काय मिळती जोड ॥२॥
आडवा होउनी गोपीसी धरिसी ।
चुंबितां वदन मज म्हणसी सोड ॥३॥
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी ।
हरी तुझी ऐसी कैशी हे खोड ॥४॥

हरी, तुझी ही खोड कशी. चिमुटे घेऊन मुळशी पळतोस, आणि गोपी तुला दोड म्हणतात. वासरे सोडून गाई पाजतोस, त्यात तुला काय जोड. आडवा होऊन गोपीला धरतोस, आणि चुंबन देताना सोड म्हणतोस. अशा चेष्टा नाम्याला करतोस. हरी, तुझी ही खोड कशी.

- संत नामदेव