गवळण

हातीं घेवूनियां काठी

नामदेवांची गवळण १९.

हातीं घेवूनियां काठी ।
शिकविते श्रीपती ।
यमुनेची माती ।
खासी कां कां कां कां ॥१॥

हरी तूं खोडी नको करूम माझ्या बा बा बा बा ॥ध्रु०॥

धांऊनियां धरिला करीं ।
बैसविला मांडिवरी ।
मुख पसरोनि करी ।
आ आ आ आ ॥२॥

विष्णुदास नामा म्हणे ।
मरोनियां जन्मा येणें ।
कृष्ण सनातन पाहूं ।
या या या या ॥३॥

हाती काठी घेऊन श्रीपती शिकवतो, यमुनेची माती खातो. हरी, माझ्या बाबाची खोड करू नको. धावून धरला, मांडीवर बसवला, मुख पसरून आ आ करतो. विष्णुदास नामा म्हणतो, मरणाने जन्म येतो, सनातन कृष्णाला पाहू या.

- संत नामदेव