गवळण

जाये जाये जाये परतोनी पाहे

नामदेवांची गवळण ७.

जाये जाये जाये परतोनी पाहे ।
लाजावला जीव पर न लगे सोय गे माय ॥१॥
नावेक विठ्ठल पाहूं द्या साजणी ।
न पुरे गे धणी डोळियांची ॥२॥
देखिला गे माय लावण्यसागर ।
नामया दातार केशिराज ॥३॥

जाते जाते, परतून पाहते. जीव लाजावला, पण सोय लागत नाही. सखी, एकदा तरी विठ्ठल पाहू द्या, डोळ्यांची धणी पुरत नाही. माय, लावण्यसागर दिसला. नामयाचा दातार केशिराज आहे.

- संत नामदेव