गवळण

कान्हां तूं आजि कां झालासि बैमान

नामदेवांची गवळण २४.

कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥

तूं तो आमुची गडी ।
म्हणोनि मी केली खोडी ।
घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥

होसी तूं आमुचा बळी ।
म्हणोनि म्यां केली कळी ।
तेथें कशाचा काय गुमान ॥२॥

जरी तूं होसी सखा ।
होऊंदे जाला वाखा ।
चल रूपवती घरीं घेऊं मान ॥३॥

समजूनियां देव ।
येक नामा नामदेव ।
जाले ते हरपले या द्वैत भान ॥४॥

कान्हा, आज का बैमान झालास. तू आमची गडी आहेस म्हणून खोडी केली, यमुनेला हुंबर घालून मान मोडू. तू आमचा बळी आहेस म्हणून कळी केली, तेथे गुमान कशाचा. तू सखा आहेस तर वाखा होऊ दे, रूपवती घरी मान घेऊ. नामा नामदेव समजून देव झाला, आणि द्वैतभान हरपले.

- संत नामदेव