गवळण

कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा

नामदेवांची गवळण १०.

कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा ।
मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा ॥१॥
वृंदावनीं वेणू वाजे रुणुझुणू ।
वेध तनुमनु गोपाळांचा ॥२॥
देहुडा पाउलीं हरि गोपाळा गोजिरीं ।
वाहाती ते लालोरी हरी छंदें ॥३॥
वेधलीं वनचरें गोधनें अपारें ।
पक्षीकुळें साचारें तल्लिन झालीं ॥४॥
यमुनेचें उदक जळचरें सम्यक ।
पाताळीं पन्नग एको ठेली ॥५॥
ऐसे कृष्ण वेधें तल्लिन झाले बोधें ।
नामा म्हणे वेणूछंदें स्थिर झाली ॥६॥

कोकिळेसारखी चित्कळा, रत्नाची कीळ, सोज्वळ मान, असा हरी वर्णित आहे. वृंदावनात वेणू रुणझुण वाजतो, गोपाळांचे तनुमन वेधले. हरि गोपाळ गोजिरी पावलांनी चालतो. वनचर आणि गोधन वेधले, पक्षीकुळ तल्लीन झाले. यमुनेचे उदक आणि जळचर सम्यक आहेत. नामा म्हणतो, कृष्णाच्या वेधाने सारे तल्लीन झाले, वेणूछंदाने स्थिर झाले.

- संत नामदेव