मल्हार महुडें गगनीं दाटलें ।
विजु खळें गर्जिन्नलें गे माय ॥१॥
गोविंद पाहाया लौकरी ।
कैसे वरुषताहे मधु धारी ये माया ॥२॥
आनंदें मयूरें नाचती आपैसे ।
प्रेमे निळकंठ झाले ते कैसे ॥३॥
नामया स्वामी द्दष्टी सोज्वळ ।
जीव लागला गोपाळेगे माय ॥४॥
गगनात मल्हार आणि महुडे दाटले, वीज खळे गर्जते. गोविंदाला पाहायला लवकर या, मधुधारी कशी वर्षते. आनंदाने मयूर नाचतात, प्रेमाने निळकंठ झाले. नामयाच्या स्वामीची दृष्टी सोज्वळ आहे, जीव गोपाळाला लागला.
- संत नामदेव