गवळण

वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ

नामदेवांची गवळण २३.

वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ ।
विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥
धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे ।
काय करुं धुरे भीत असों ॥२॥
घरींचा म्हातारा हाणितला येणें ।
काय सांगूं उणें तुजपाशीं ॥३॥
मी वो लटिकी तरी नामयासी पुसा ।
तुझा बाळू कैसा आसंदत ॥४॥

दशवंती, आपला बाळ वारी विकट खेळ खेळतो. धाकुट्या मुलांचे चिमोरे घेतो, भीत आहोत. घरीचा म्हातारा याणें हाणितला. मी लटिकी असेन तर नामयाला पुस, तुझा बाळू कसा असतो.

- संत नामदेव