गवळण

यशोदेचा बाळ अलगट

नामदेवांची गवळण १३.

यशोदेचा बाळ अलगट ।
रूपें राजस बरवा बरवंट ॥१॥
वेधीं लावूनि वेधिलें येणें मानस ।
आड घालूनि आपुला प्रकाश ॥२॥
आपणासींच खेळे विनोदें ।
विश्व निववी तेणें सुखे निज बोधें ॥३॥
द्दष्टी याची पावे देखाणीया ।
आड रिघोनि तेज सांवळें भरिलें डोलियां ॥४॥
मन मारोनि आर्त पुरविले ।
रूप दावूनि चित्त माझें भुलविलें ॥५॥
नामया स्वामी आसनीं शयनीं ।
दुरी नवजे डोळ्य़ांपासोनी ॥६॥

यशोदेचा बाळ अलगट आहे, रूपाने राजस आणि बरवा. वेध लावून मानस वेधले, आड घालून आपला प्रकाश दाखवला. आपणालाच विनोदाने खेळतो, विश्वाला निजबोधाने निववतो. दृष्टी पावे देखाणीया, डोळ्यात सांवळे तेज भरले. मन मारून आर्त पुरविले, रूप दाखवून चित्त भुलविले. नामयाचा स्वामी आसनी आणि शयनी डोळ्यांपासून दूर होत नाही.

- संत नामदेव