मनाचे श्लोक

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी

मनाचे श्लोक १०.

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी ।
दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी ॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥ १०॥

रामात प्रीती नेहमी धरावी, आणि दुःख स्वतः सोडून द्यावे. देहाचे दुःख सुख मानत जावे. विवेकाने स्वस्वरूपात भरावे.

- समर्थ रामदास