मनाचे श्लोक

यथासांग रे कर्म तेंहि घडेना

मनाचे श्लोक १००.

यथासांग रे कर्म तेंहि घडेना ।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना ॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना ।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥ १००॥

सांगितले ते कर्मही घडत नाही. धर्म घडला तरी पुण्य गांठी पडत नाही. दया पाहिली तर ती सर्व भूतांत नाही. फुकट दिलेले नामही तोंडात राहत नाही, असा हा खेद आहे.

- समर्थ रामदास