जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावें ॥ १०१॥
ज्याला नाम आवडत नाही त्याची यम जाच करतो. विकल्पाने तर्क उठतो आणि नरक ची ची होते. आदराने नाम घ्यावे. मुखाने बोलता दोष आपोआप जातात.
- समर्थ रामदास