हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थीं मना सांडि जीवीं करावी ॥ १०३॥
हरीकीर्तनात रामाची प्रीती धरावी. निरूपणाने देहबुद्धी विसरावी. परद्रव्य आणि पराची कांता सोडून द्यावी.
- समर्थ रामदास