मनाचे श्लोक

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते

मनाचे श्लोक १०४.

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते ।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४॥

क्रियेवाचून नाना तऱ्हेने बोलतात, पण दुश्चीत चित्त लाजवते. मनाची कल्पना धीट सैराट धावते. असा माणूस देवाकडे कसा पावेल.

- समर्थ रामदास