विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडिं संसारतापा ॥ १०५॥
विवेकाने आपली क्रिया पालटावी, आणि आदराने शुद्ध क्रिया धरावी. बोलण्यासारखे चालावे. संसाराच्या तापाची कल्पना सोडावी.
- समर्थ रामदास