मनाचे श्लोक

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा

मनाचे श्लोक १०६.

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभुतीं जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६॥

स्नानसंध्या एकनिष्ठेने चांगली करावी. विवेकाने स्थानभ्रष्ट मनाला आवरावे. सर्व भूतांत दया असलेला प्रेमळ भक्तीभावाने निवतो.

- समर्थ रामदास