मनाचे श्लोक

मना कोपआरोपणा ते नसावी

मनाचे श्लोक १०७.

मना कोपआरोपणा ते नसावी ।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७॥

कोप आणि आरोप मनात नसावा. बुद्धी साधुसंगतीत वसावी. नष्ट चांडाळ संग सोडा. मोक्षाचे भागीदार व्हा.

- समर्थ रामदास